गोपनीयता धोरण
व्हर्जन 2.0–2.1 साठी आवृत्ती, दिनांक 1 नोव्हेंबर, 2026 · Uniconduct LLC
1. आढावा
हे गोपनीयता धोरण Uniconduct LLC (‘आम्ही’) ने iPhone, iPad आणि Apple silicon असलेल्या Mac साठी बनवलेल्या Intuition Check ॲपला (‘ॲप’) लागू होते. ॲप कोणता डेटा हाताळते, तो कुठे ठेवला जातो, काय आणि केव्हा तुमच्या डिव्हाइसबाहेर जाते, आणि तुम्ही तो कसा हटवू शकता, हे ह्या धोरणात वर्णन केले आहे.
2. ॲप काय गोळा करत नाही
ॲपमध्ये अकाउंट नाहीत आणि ते कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. त्यात ॲनालिटिक्स, क्रॅश रिपोर्टिंग, जाहिरात किंवा ट्रॅकिंगचा कोणताही कोड नाही, ते जाहिरातींचे आयडेंटिफायर वाचत नाही, आणि आम्हाला काहीही पाठवत नाही. ॲप कोणतेही ट्रॅकिंग करत नसल्यामुळे, ‘Do Not Track’ सिग्नलने बंद करण्यासारखे काहीच नाही.
3. तुमच्या डिव्हाइसवर ठेवला जाणारा डेटा
ॲप तुमच्या डिव्हाइसवरील त्याच्या स्वतःच्या स्टोरेजमध्ये पुढील गोष्टी ठेवते :
- सेटिंग, फ्री तासापैकी किती वेळ वापरला गेला आहे आणि तो किती वेळा रीसेट केला गेला आहे, ह्यासह.
- तुमचे संच — खेळण्याचे पत्ते, संख्या आणि इमेज, तुम्ही समाविष्ट केलेल्या छायाचित्रांसह.
- आकडेवारी. ‘झटपट निवड’ आणि ‘मालिका’ खेळण्याच्या पद्धतींमध्ये, आणि ‘अंदाजांची नोंद’ चालू असताना ‘एकेक करून’ मध्ये खेळलेल्या फेऱ्या ॲप नोंदवते — संच आणि मोड, आलेले मूल्य, तुमचा अंदाज आणि तो बरोबर होता का, तुम्ही नोंदवलेली स्थिती, आणि दिनांक आणि वेळ ह्यांसह. ‘आकडेवारी डिव्हाइसवर जतन करा’ चालू नसल्यास, ह्या नोंदी तुम्ही ॲपमधून बाहेर पडेपर्यंतच राहतात. आकडेवारीच्या व्ह्यूमध्ये तुम्ही त्या क्लिअर करू शकता.
- स्थिती, ज्या तुम्ही एखाद्या फेरीसाठी नोंदवू शकता, तुम्ही समाविष्ट केलेल्या स्थितींसह, आणि आत्ता निवडलेल्या स्थिती.
- जोडीदारासोबत खेळाचा डेटा — तुम्ही जोडीदारांना दिलेली नावे, जोडीदारांनी तुम्हाला जे पाठवले ते (विभाग 4), आणि ॲप ह्या इंस्टॉलेशनसाठी तयार करते तो एक यादृच्छिक आयडेंटिफायर; तो तुमच्या डिव्हाइसशी किंवा तुमच्या Apple अकाउंटशी जोडलेला नाही आणि ॲपच्या डेटासोबतच हटवला जातो.
जोडीदारासोबत खेळ (विभाग 4) आणि तुम्ही एक्सपोर्ट करता त्या फाइल (विभाग 5) सोडून, ॲप ह्यापैकी काहीही तुमच्या डिव्हाइसबाहेर पाठवत नाही.
4. जोडीदारासोबत खेळ
जोडीदारासोबत खेळ जवळपासची दोन डिव्हाइस कनेक्ट करतो — दोन्ही वापरत असलेल्या Wi-Fi नेटवर्कवरून, किंवा ती जवळ असताना डिव्हाइसवरून डिव्हाइसवर. तो उघडा असताना :
- तुमचे डिव्हाइस जवळपास दिसते. त्याच नेटवर्कवरील किंवा जवळ असलेल्या डिव्हाइसना तुमच्या डिव्हाइसचे नाव आणि ह्या इंस्टॉलेशनच्या आयडेंटिफायरवरून काढलेला एक कोड दिसू शकतो. iPhone आणि iPad वर हे नाव ‘iPhone’ सारखे सामान्य असते. कोड प्रत्येक वेळी तोच राहतो, त्यामुळे ज्या डिव्हाइसने तो आधी पाहिला आहे, ते डिव्हाइस तो ओळखू शकते.
- ते ऑटोमॅटिकली कनेक्ट होते — जिथे जोडीदारासोबत खेळही उघडा आहे अशा जवळच्या डिव्हाइसशी; ते डिव्हाइस तुम्ही निवडत नाही. ते त्याच नेटवर्कवरील किंवा जवळ असलेल्या दुसऱ्या कोणाचेही डिव्हाइस असू शकते.
- जोडीदाराकडे काय जाते : संचाच्या नावासह फेरीचे सेटिंग, लपवलेले मूल्य, तुमचा अंदाज, ह्या इंस्टॉलेशनचा आयडेंटिफायर आणि तुमच्या डिव्हाइसचे नाव. तुम्ही इमेज संचासोबत खेळल्यास, तो संचही : त्याचे नाव, सेटिंग, कॅप्शन, तयार केल्याचा दिनांक, फाइल ॲपमधून समाविष्ट केलेल्या इमेजची फाइल नावे, आणि इमेज.
- तुमचे डिव्हाइस जोडीदाराकडून काय ठेवते : जोडीदार ज्या संचासोबत फेरी सुरू करतात अशा प्रत्येक संचासाठी (इमेज संचासाठी, तुम्ही ‘डाउनलोड करा’ वर टॅप केल्यानंतर) त्याचे नाव आणि सेटिंग, जोडीदाराच्या डिव्हाइसचे नाव आणि त्यांच्या आयडेंटिफायरवरून काढलेला एक कोड, आणि इमेज संचासाठी त्याच्या इमेजसह तो संचही. ‘मिळालेले इमेज संच राखून ठेवा’ ऑफ असल्यास, तुम्ही जोडीदारासोबत खेळातून बाहेर पडल्यावर मिळालेले इमेज संच हटवले जातात. तुम्ही जोडीदाराला नाव देऊ शकता; ते नाव तुमच्या डिव्हाइसवर राहते.
- तुम्ही पाठवलेला डेटा जोडीदाराचे डिव्हाइसही त्याच प्रकारे ठेवते, त्याच्या स्वतःच्या सेटिंगनुसार.
दोन्ही डिव्हाइसमधील कनेक्शन एनक्रिप्ट केलेले असते. जोडीदारासोबत खेळातील काहीही आमच्याकडे येत नाही.
जोडीदारासोबत खेळासाठी स्थानिक नेटवर्कचा ॲक्सेस आवश्यक आहे; तुम्ही पहिल्या वेळी जोडीदारासोबत खेळ उघडता तेव्हा तुमचे डिव्हाइस त्याची अनुमती मागते. तुम्ही तो गोपनीयता व सुरक्षा → स्थानिक नेटवर्क येथे बंद करू शकता : iPhone आणि iPad वर सेटिंगमध्ये, किंवा Mac वर सिस्टीम सेटिंगमध्ये (System Settings → Privacy & Security → Local Network).
5. तुमच्या इमेज आणि फाइल
तुम्ही समाविष्ट करता ती छायाचित्रे सिस्टीमच्या छायाचित्र पिकरमधून येतात, जो ॲपला फक्त तुम्ही निवडलेल्या इमेज देतो. कॅमेरा : तुम्ही ॲपमध्ये काढलेली छायाचित्रे तुमच्या संचात जातात, तुमच्या छायाचित्र लायब्ररीत नाही; तुम्ही ॲपमध्ये पहिल्या वेळी कॅमेरा उघडता तेव्हा तुमचे डिव्हाइस कॅमेऱ्याच्या ॲक्सेसची अनुमती मागते, आणि तुम्ही तो गोपनीयता व सुरक्षा → कॅमेरा येथे बंद करू शकता. फाइल : तुम्ही इमेज किंवा संचाची फाइल इम्पोर्ट करू शकता.
तुम्ही संच .guesset फाइल म्हणून एक्सपोर्ट करू शकता — त्याचे नाव, सेटिंग, कॅप्शन, फाइल ॲपमधून समाविष्ट केलेल्या इमेजची फाइल नावे आणि इमेज ह्यांसह — आणि तुमची आकडेवारी CSV फाइल म्हणून, आकडेवारीच्या व्ह्यूमधील तुमचे फिल्टर दाखवत असलेल्या नोंदींसह. दोन्हीपैकी कोणतीही फाइल फक्त तुम्ही पाठवता तिथेच, तुम्ही निवडलेल्या मार्गाने जाते.
6. खरेदी आणि सदस्यता
खरेदी आणि सदस्यता App Store मधून होतात. तुमचे पेमेंटचे तपशील आणि Apple अकाउंट Apple कडेच राहतात आणि आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. काय उपलब्ध करायचे हे जाणून घेण्यासाठी, ॲप App Store ला विचारते की तुमची सदस्यता सक्रिय आहे का आणि तुम्ही कोणते संच खरेदी केले आहेत; हे उत्तर Apple कडून येते आणि आम्हाला पाठवले जात नाही. तुमचा ॲक्सेस कौटुंबिक शेअरिंगद्वारे मिळत असल्यास, तो तुमच्यासोबत शेअर केला गेला आहे हे ॲपला दिसते, पण तो कोणी शेअर केला हे दिसत नाही.
7. आम्हाला काय मिळते
- Apple कडून : विक्री, सदस्यता आणि आम्हाला होणाऱ्या पेमेंटचे रिपोर्ट, ज्यांमध्ये तुमचे नाव किंवा संपर्काचे तपशील नसतात; आणि, तुम्ही तुमच्या डिव्हाइसला ॲप डेव्हलपरसोबत ॲनालिटिक्स शेअर करण्याची अनुमती दिली असल्यास, क्रॅश रिपोर्ट आणि वापराची आकडेवारी — Apple जे App Store वरील प्रत्येक ॲपसाठी गोळा करते तेच; ॲप त्यांमध्ये स्वतःचे काहीही जोडत नाही.
- तुमच्याकडून : तुम्ही App Store वर प्रकाशित करता ते रिव्ह्यू, आणि तुम्ही आम्हाला पाठवलेला ईमेल. ‘सपोर्टशी संपर्क साधा’ बटण तुमच्या मेल ॲपमध्ये एक ड्राफ्ट उघडते, ज्यात ॲपचे व्हर्जन, सिस्टीमचे व्हर्जन आणि डिव्हाइसचे मॉडेल आधीच असते; तुम्ही तो पाठवला तरच तो आमच्यापर्यंत पोहोचतो. तुमचा ईमेल ॲड्रेस आणि संदेश आम्ही फक्त उत्तर देण्यासाठी वापरतो.
8. Apple आणि लिंक
ॲपमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी सेवा नाहीत. App Store, पेमेंट, कौटुंबिक शेअरिंग, डिव्हाइसचे बॅकअप आणि तुम्ही Apple सोबत शेअर करायचे निवडलेले ॲनालिटिक्स ह्यांसाठीचा डेटा Apple Apple च्या गोपनीयता धोरणानुसार प्रोसेस करते, आमच्या धोरणानुसार नाही. ॲपमधील काही घटक लिंक आहेत : तुम्ही त्यांपैकी एखाद्यावर टॅप केल्यावर, पेज तुमच्या ब्राउझरमध्ये किंवा App Store मध्ये उघडते, जे त्यांच्या स्वतःच्या गोपनीयता धोरणांनुसार चालतात. ॲप स्वतःहून काहीही उघडत नाही. ‘मदत’ हा ॲपचाच एक भाग आहे आणि तो इंटरनेट कनेक्शनशिवाय काम करतो; अपवाद फक्त त्यातील वेब लिंकचा, ज्या पूर्ण पत्त्यासह लिहिलेल्या आहेत.
9. डेटा ठेवणे आणि हटवणे
तुमच्या डिव्हाइसवरील ॲपचा डेटा तुम्ही तो ॲपमध्ये हटवेपर्यंत किंवा ॲप हटवेपर्यंत राहतो. Mac वर ॲप हटवल्यानंतरही त्याचा डेटा ~/Library/Containers मधील ॲपच्या फोल्डरमध्ये राहतो, जोपर्यंत तुम्ही ते फोल्डर हटवत नाही. डिव्हाइसवर जतन न केलेली आकडेवारी तुम्ही ॲपमधून बाहेर पडल्यावर नाहीशी होते. तुमच्या डिव्हाइसच्या बॅकअपमध्ये — iCloud वर किंवा कॉम्प्युटरवर — ॲपचा डेटा असतो; हे बॅकअप तुमच्याकडे किंवा, iCloud च्या बाबतीत, Apple कडे ठेवले जातात, आमच्याकडे नाही. तुम्ही पाठवलेला डेटा जोडीदाराच्या डिव्हाइसवर तिथे हटवला जाईपर्यंत राहतो. तुम्ही आम्हाला पाठवलेला ईमेल तुमचा प्रश्न सुटेपर्यंत ठेवला जातो. तुमचा ईमेल त्याआधीच हटवला जावा असे वाटत असल्यास, आम्हाला लिहा.
10. मुले
ॲप मुलांसह कोणालाही वैयक्तिक माहिती विचारत नाही. एखाद्या मुलाने आम्हाला लिहिल्यास, आम्ही तो संदेश फक्त उत्तर देण्यासाठी वापरतो (विभाग 7).
11. ह्या धोरणातील बदल
ह्या धोरणाची प्रत्येक आवृत्ती ॲपच्या एका व्हर्जनसाठी असते आणि त्या व्हर्जनला आणि नंतरच्या व्हर्जनना लागू होते, जोपर्यंत नंतरच्या एखाद्या व्हर्जनसोबत नवीन आवृत्ती येत नाही. तुमच्या डिव्हाइसवरील व्हर्जनसाठीची आवृत्ती तुम्हाला लागू होते. दिनांक म्हणजे ती आवृत्ती प्रकाशित झाल्याचा दिवस.
12. आमच्याशी संपर्क साधा
ह्या धोरणाबद्दलचे प्रश्न : [email protected].